आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात या वेळी तब्बल 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.

17 तारखेला होणार्‍या मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शनिवारी अंतिम मुदत होती. हाफिज धत्तुरे यांनी माघार घ्यावी, यासाठी मनधरणी करायला पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील आणि उल्हास पवार हे नेते सकाळीच सांगलीत आले होते; मात्र, धत्तुरे किंवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी चर्चेला गेला नाही. धत्तुरे तर गायबच होते. निवडणूक चिन्ह वाटपासाठीही धत्तुरे किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना निराश होऊन परतावे लागले. येथे 17 उमेदवार रिंगणात राहिल्याने दोन मतदानयंत्रांचा वापर करण्यात येईल.