आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांमागचा ब्रेन ‘अ‍ॅनिमेटर’ तरुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - अॅनिमेशनमध्ये डिप्लोमा केलेला तरुण बनावट नोटांच्या निर्मितीमागचा सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नोटा तयार करण्याचा या टोळीचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि त्या खपवण्यात त्यांना अपयश आल्याने टोळीतील सर्व ११ संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. २००५ पूर्वीच्या नोटांची नक्कल करून मोठ्या संख्येने बनावट नोटा बँकेमध्ये खपवण्याची कल्पना प्रवीण कांबळे या सांगलीतील तरुणाच्या डोक्यात आली. त्यातून त्याने बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्नही केला. त्याचा अॅनिमेशनचा डिप्लोमा केलेल्या संदीप मुदलगी या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील तरुणाशी संपर्क आला. त्याने आपली कल्पना संदीपला सांगितली. संदीपने आपल्या ‘अॅनिमेशन’च्या कल्पनांचा पुरेपूर वापर करून हुबेहूब बनावट नोटा करून दाखवल्या.
नोटा तयार करण्याचे तंत्र सापडल्यावर साहित्य खरेदी करणारे गुंतवणूकदार मिळाल्यानंतर या सर्वांनी दत्तवाड येथे नोटांचा कारखानाच उभारला. पहिल्याच झटक्यात त्यांनी ३५ लाख रुपयांच्या नोटा तयार केल्या. एवढ्या मोठ्या नोटा खपवण्यासाठी त्यांनी मिरजेतील स्टेट बँक आॅफ हैदराबाद गाठली; मात्र पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याने मोठ्या संख्येने बनावट नोटा चलनात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले.