सांगली - जिल्ह्यातील इस्लामपूर नगर परिषदेने संपूर्ण शहरात मोफत ४ जी वायफाय सेवा सुरू केली आहे. अशी सेवा देणारी ही देशातील पहिली नगर परिषद ठरली आहे.
माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकारातून आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीच्या सहकार्याने इस्लामपुरात ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते झाला.
असे होता येईल कनेक्ट
वायफाय अॅक्सेस पॉइंटशी कनेक्ट होता येईल. त्यासाठी फोनचे वायफाय सुरू करून जिओनेट निवडावे लागेल. नाव, मोबाइल क्रमांकासह ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. एकदा मिळालेली सेवा २४ तासांसाठी लागू राहील. त्यानंतर नव्याने नोंदणी करावी लागेल.
पुढील स्लाइडवर वाचा कुणाची आहे संकल्पना...