आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangli Miraj Kupwada Municipal Election Prachar Electronic System

दृक-श्राव्य प्रचाराने सांगलीत आणली रंगत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - काळाबरोबर बदल केले नाहीत तर विनाश अटळ असतो, हे राजकारणीही पक्के जाणून आहेत. म्हणूनच सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आजच्या पिढीला भावेल अशा दृक-श्राव्य माध्यमातून आणि मोबाइलवर थेट नेत्यांची भाषणे एमएमएस करून रंगत आणली आहे.
7 जुलै रोजी सांगली महापालिकेसाठी मतदान होणार आहे. मतदानाला आता आठवडा उरल्याने प्रचाराचा धुरळा उठला आहे. रिक्षावरून उमेदवारांचा उदो-उदो करणार्‍या ध्वनिफितींसह मोठमोठ्या डिस्प्ले व्हॅनवरून पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या (?) कामांची माहिती देणारे माहितीपट झळकत आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 5 वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेणारी तसेच जयंत पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन केल्याची डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे. विरोधी काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीने सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा पंचनामा करणारा माहितीपट तयार केला आहे.

प्रचार साहित्यात राष्ट्रवादी आघाडीवर आहे. माहितीपटासोबतच राष्ट्रवादीने पथनाट्य, कलापथक आणि विनोदी स्किटचे सादर करणार्‍या कलाकारांचा मुंबई, ठाण्यातील ताफा आणला आहे. मनसेने पथनाट्य कलाकारांचे पथक आणले आहे. बहुतेकांनी प्रचारासाठी उपयुक्त मोबाइल सॉफ्टवेअर्स वापरली आहेत. नेत्यांची भाषणे, उमेदवारांच्या घोषणा एमएमएसच्या माध्यमातून प्रभागातील मतदारांना पाठवल्या जात आहेत.