आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भटक्या कुत्र्यांनी घेतला बालकाचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - शहरातील देवी कॉलनीत राहणार्‍या एका पाचवर्षीय मुलाचा भटक्या कुत्र्यांनी बळी घेतला. सुमारे दहा ते बारा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात रमाकांत राजेंद्र दळवी याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली.

बालपणीच आई- वडिलांचे छत्र हरपल्याने रमाकांत हा र्शीकांत व लतिका सावंत या नातेवाइकांकडे राहत होता. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रमाकांत आपल्या घराशेजारी असलेल्या आमराईकडे निघाला होता. त्याच वेळी रस्त्यातच त्याच्यावर सुमारे दहा ते बारा कुत्र्यांनी हल्ला चढवला. यामुळे भांबावलेला रमाकांत प्रतिकारही करू शकला नाही.परिसरातील लोकांनी जखमी अवस्थेतील रमाकांतला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.