आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रूरकर्मा डाॅ. पाेळने अार्थिक कारणावरूनच केले तिघांचे खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा/ सांगली - गेल्या १३ वर्षांत पाच महिलांसह सहा जणांचे खून करणारा वाई (जि. सातारा) येथील क्रूरकर्मा डाॅ. संताेष पाेळ हा मानसिक रुग्ण नसल्याचे पाेलिस तपासात स्पष्ट झाले अाहे. अार्थिक कारणावरून त्याने सुरेखा चिकणे, जगाबाई पाेळ व सराफा व्यापारी नथमल भंडारी यांचा खून केल्याचे समाेर अाले अाहे. तसेच अापल्या गुन्हेगारी कारवायांचे बिंग फुटू नये म्हणून सलमा शेख व मंगला जेधे या दाेघींचा खून त्याने केल्याचीही प्राथमिक माहिती अाहे.

डाॅ. पाेळने २००३ ते २०१६ दरम्यान पाच महिलांसह सहा जणांचे खून केले हाेतेे. ताे मानसिक रुग्ण असल्याचा संशय व्यक्त हाेत हाेता. मात्र पाेलिसांनी केलेल्या तपासात पाेळ हा मानसिकदृष्ट्या सक्षम असून अतिशय थंड डाेक्याने त्याने हे खून केल्याची माहिती समाेर अाली अाहे.

‘सुरेखा चिकणे व जगाबाई पाैळ यांचा अापण खून केल्याची माहिती मंगला जेधेला हाेती. याबाबत तिने कुठेही वाच्यता करू नये म्हणून अापण मंगलचा खून केला,’ अशी कबुली अाराेपी पाेळने पाेलिसांकडे दिली अाहे. मंगल या महिलेचा सहावा खून केल्यानंतर त्याच्या पापाचा घडा भरला व ताे पकडला गेला.

चिकणेचा खून साेन्यासाठी
चिकणेे या महिलेचे अापल्या एका नातेवाइकाशी वाद हाेते. तिच्याकडे माेठ्या प्रमाणावर साेन्याचे दागिने हाेेते. ही बाब मंगला जेधेने डाॅ. पाेळला सांगितली व तिच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार डाॅ. पाेळने मध्यस्थी केली. त्यानंतर चिकणे व पाेळ यांच्या गाठीभेटी वाढल्या. ती पाेळकडे उपचारासाठीही अधूनमधून यायची. तिच्याकडे साेने मिळवण्यासाठी पाेळने चिकणेलाच संपवले. जगाबाई हिची बळकावलेली जमीन मिळवून देण्यासाठी डाॅ. पाेळने मदत केली हाेती. यातूनच ती त्याच्या संपर्कात अाली व त्याने तिलाही संपवले. उपचारासाठी येणारा सराफा व्यावसायिक भंडारीलाही पाेळने साेने बळकावण्यासाठीच संपवल्याचे स्पष्ट झाले अाहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी सातारा पाेलिस करत असून, यातून डाॅ. पाेळच्या अजूनही अनेक गुन्हेगारी कारवाया समाेर येतील, असा विश्वास पाेलिसांना वाटताे.
बातम्या आणखी आहेत...