आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satara Loksabha Election 2014 Latest News In Marathi

महायुतीचा सातारचा उमेदवार बदलला, अशोक गायकवाड रिपाईच्या तिकीटावर लढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने त्यांचा उमेदवार बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुतीने संभाजी संपकाळ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्या हलचाली पक्षविरोधी असल्याचे कारण देत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेना - भाजप - रिपाई महायुतीच्या जागावाटपात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची साता-याच्या एकमेव जागेवर बोळवण करण्यात आली आहे. त्यातही त्यांनी तिकीट दिलेले संभाजी संकपाळ हे खासदार भोसले यांचेच कार्यकर्ते असल्याची चर्चा सुरु झाली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतही संकपाळ यांनी प्रचाराला सुरवात केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या हलचालींबद्दल शंका घेतली जात होती. यामुळे रिपाई नेते रामदास आठवले यांनी अखेर उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. आता महायुतीतर्फे अशोक गायकवाड सातारा लोकसभेची जागा लढविणार आहेत. ते उदयनराजे भोसले यांना कशी टक्कर देतात हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
संभाजी संकपाळ हे मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे मराठा समाजाची मते महायुतीला फोडता येतील, असा आठवले यांना विश्वास होता. मात्र, संकपाळ हे उदयनराजेंचेच कार्यकर्ते असल्याचा प्रचार सुरु झाला. निवडणूक प्रचाराला ते बाहेर पडत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रिपाईला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली.