आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीवर उदयनराजेंची टीका, म्हणाले- आमच्या सातारला मोदी पेढेवाला, कशाला घाबरता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदी निर्णय भाजप खासदार-आमदारांनाही पटलेला नाही, मात्र मोदींच्या भीतीमुळे ते बोलत नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. उदयनराजेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत, पोटात नसेल तर डोकं काम करत नाही, अशावेळी लोकांनी बँका फोडल्या तर नवल वाटायला नको, असे म्हटले आहे. मोदींना काय घाबरता, असे म्हणत आमच्याकडे कंदी पेढेवाला मोदी असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

नोटबंदीवर सडकून टीका
कराडमध्ये प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर खासदार भोसले माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या घोषणेनंतर रोज वेगवेगळे नियम बदलत असल्याने जनतेमध्ये उद्रेक असल्याचे उदयनराजे म्हणाले.

वणवा पेटला तर कोणीही रोखू शकणार नाही.
ना राज्य सरकार काही करु शकेल, ना केंद्र सरकार रोखू शकेल. लोक बँकेत घुसतील बँका लुटतील.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या, काय म्हणाले उदयनराजे भोसले
बातम्या आणखी आहेत...