आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातार्‍यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी बाळू खंदारे याने गुरुवारी रात्री टोलनाक्यावर गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी खंदारेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू खंदारे आणि काही जणांचे दोन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर भांडण झाले होते. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांना धमक्याही दिल्या होत्या. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या टोलनाक्यावर खंदारे यास दुसर्‍यागटातील देशमुख नामक व्यक्ती दिसली. त्यामुळे खंदारेचे पित्त पुन्हा खवळले. या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. खंदारे याने स्वत:जवळील पिस्तूल काढून देशमुखच्या दिशेने गोळी झाडली, मात्र सनी भोसलेने खंदारेचा हात धरून त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिस्तुलातील तिन्ही गोळ्या हवेत झाडल्या गेल्या.