आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातार्‍यात खंबाटकी घाटात दोन जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - जिल्ह्यातील खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटातील वळणावर रविवारी पुन्हा एकदा अपघात झाला, त्यात दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. खंबाटकी घाट संपताच समोर असलेल्या वळणार वारंवार अपघात घडत आहेत. सातार्‍याहून पुण्यास जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी कठड्यावर जोरात आदळली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यात बसवराज व्यकण्णा मुळगुंद (21 रा. मुधोळ, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी विरोप्पा शाहापुरे यांचे रुग्णालयात नेताना निधन झाले. किरण मुपागे, गजानन गण्णूर आणि पृथ्वी चव्हाण या तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या दोन अपघातांनंतर पोलिसांनी हा रस्ता बांधणार्‍या कंपनीवर गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यानंतरही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही, हे विशेष.