सातारा- सियाचीनमधील हिमस्खलनात शहीद झालेले 'मद्रास रेजिमेंट'चे जवान सुनील विठ्ठल सूर्यवंशी (वय 29) यांच्या पार्थिवावर मूळगावी मस्करवाडीत (ता. माण) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शूरवीराला लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. आई-वडील व पत्नी रेखाने सूनील यांचे अंतिम दर्शन घेतले व बंधू तानाजी व चार वर्षाच्या मुलीने मुखाग्नी दिला.
पुण्यातील लोहगाव विमानतळावून विशेष विमानने सुनील यांचे पार्थिव कुक्कडवाड येथे आणण्यात आले. कुक्कडवाड येथून सकाळी शहीद सूनील सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सूनील यांचे पार्थिव आधी घरी नेण्यात आले. तिथे त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतले.
सुनील यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर लोटला होता. 'सुनील सूर्यवंशी अमर रहे, वंदे मातरम् , अशा घोषणांमध्ये शहीद सूनील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंचक्रोषीतील लोक मोठ्या संख्येन सूनील यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
सियासिचमधील हिमस्खलनात गेल्या आठवड्यात दहा जवान दबले गेले होते. त्यात सूनील सूर्यवंशी यांचा समावेश होता. खराब हवामानामुळे शहीद झालेल्या सर्व जवानांचे पार्थिव आणण्यात अनेक अडथळे आले. शहीद झाल्यानंतर तब्बल एक आठवड्यानंतर सूनील यांचे पार्थिव मूळगावी मस्करवाडीत पोहोचले.
सुनील सूर्यवंशी हे पाच वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. सियाचीनला कार्यरत होते. 19 हजार 600 फूट उंचीवरील सोनम पोस्टवर त्यांची तुकडी तैनात होती.
13 फेब्रुवारीला घरी येणार होते सूनील सूर्यवंशी...
सूनील सुर्यवंशी 13 फेब्रुवारीला घरी येणार होते. 14 फेब्रुवारीला सूनील यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. सूनील यांनी घर बांधले होते. 19 फेब्रुवारीला त्यांच्या घराची वास्तूशांती होती. मात्र, त्याआधीच सूनील यांचे पार्थिव पोहोचले.
गावातील प्रत्येक घरात जाऊन आस्थेने करत विचारपूस...
सुनील यांचे प्राथमिक शिक्षण मस्करवाडीत, माध्यमिक शिक्षण जवळच्या कुकुडवाड येथील शंभू महादेव विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण दहिवडीत झाले आहे. कॉलेजमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून त्यांचा लौकिक होता. नोकरी करायची तर सैन्यातच असे ठरवूनच ते सैन्यात भरती झाले होते. ते ज्यावेळी गावाकडे सुटीवर येत, त्यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करत. सुनील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व चार महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा....
@'व्हॅलेंटाइन डे'ला ते येतील, मला सरप्राइज देतील; पत्नीला होती आशा
@ पाहा, शहीद सुनील सूर्यवंशींच्या कुटुंबियांचे फोटो...