आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हारतुरे टाळून नेत्याचे ४४ लाख वह्यावाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - एखादा लोकप्रतिनिधी एखादा प्रघात बदलून त्याला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा किती मोठे काम उभे राहू शकते याचा वस्तुपाठ काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ स्वीकारायचे नाहीत असे ठरवले. कार्यकर्ते, हितचिंतकांना त्यांनी वह्या भेट देण्याचे आवाहन केले. भरभरून प्रतिसाद मिळाला. गेल्या सात वर्षात अशा ४४ लाख वह्यांचे संकलन झाले असून आतापर्यंत ९ लाख विद्यार्थ्यांना त्या माेफत वाटप करण्यात आल्या. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे.

सात वर्षांपूर्वी आमदार असलेल्या पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला. या वह्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना देण्याचे जाहीर केले. मग कार्यकर्त्यांनी तर लोडिंग रिक्षा, टेम्पोने वह्या आणणे सुरू केले. २००७ मध्ये २ लाख १२ हजार वह्या संकलित झाल्या. या वर्षी हा आकडा ५ लाख २१ हजारांवर गेला. या वह्यांचे गठ्ठे बांधून जि.प. शाळांत गरजू मुलांपर्यंत त्या पोहोचवण्याची खास यंत्रणा आहे.

पराभवानंतरही उपक्रम कायम
मागील विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील पराभूत झाले. मात्र हा उपक्रम बंद झालेला नाही. विशेष म्हणजे तो थांबू नये यासाठी पराभवानंतरही वाढदिवशी सतेज पाटील कोल्हापुरात हजर राहिले. कार्यकर्त्यांनीही यंदा सव्वापाच लाख वह्या भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
बातम्या आणखी आहेत...