आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship Scandal Tainted Inspector Committed Suicide

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील निरीक्षकाची आत्महत्या, काेल्हापूरच्या यात्री निवासामध्ये गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - समाजकल्याण विभागातील शिष्यवृत्तीत घाेटाळा प्रकरणातील संशयित निरीक्षक अंगद चतुर्भुज मुकटे (वय ५३, रा. मोरारजी पेठ, सोलापूर) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रात्री उशिरा सोलापूरहून नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला.

चार दिवसांपूर्वी मुकटे कोल्हापुरात आले होते. महाद्वार रोडजवळील कपिलतीर्थ मंडईसमोरील एका यात्री निवासामध्ये ते राहत होते. रोज सकाळी उठून बाहेर जाणे, कोल्हापूर आणि परिसरात फिरून येणे, नाष्टा करून जेवण करून पुन्हा खोलीत येऊन झोपणे असा दिनक्रम सुरू होता. मात्र गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत दरवाजा उघडला नसल्याने यात्री निवासच्या मालकांनी खात्री केली असता पंख्यासाठीच्या हुकाला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

याबाबत जुना राजवाडा पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सीपीआर इस्पितळाकडे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यात्री निवासच्या नोंदीमधील नंबरवरून फोन केल्यानंतर आणि त्यावरील नावामुळे मुकटेची ओळख पटली. रात्री आठपर्यंत नातेवाईक न आल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.

मोबाइमुळे कळली अात्महत्या
बुधवारी सकाळी १० पर्यंत दार उघडले नसल्याने यात्री निवासच्या मालकांनी पुण्याहून आलेल्या एका गृहस्थाला व्हिडिओ शूटिंगचा मोड लावून मोबाइल दाराखालून खोलीत ढकलण्यासाठी सांगितला. यानंतर पुन्हा मोबाइल बाहेर ओढून घेऊन पाहिले असता मुकटे यांचा मृतदेह लटकत असल्याचे त्यामध्ये दिसले. यानंतर मग पोलिसांनी कळवण्यात आले.

मला घरच्यांचा त्रास
मला घरचे त्रास देतात. त्यामुळे आपण कोल्हापुरात चार दिवस राहायला आल्याचे मुकटे यांनी यात्री निवासमध्ये बोलताना सांगितले होते. याच दरम्यान मुकटे जाेतिबालाही दर्शनासाठी जाऊन आल्याचे सांगितले जाते.