आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Head Mistress Suicide At School At Kolhapur

कोल्हापूरात शाळेच्या वर्गातच मुख्याध्यापिकेची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कार्यशाळेतून बाहेर पडत एका मुख्याध्यापिकेने चक्क शाळेतच गळफास घेतल्याची थरारक घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कोल्हापुरातील वसंतराव चौगुले प्राथमिक शाळेत घडली. विद्या दत्तात्रय जाधव (वय 55 ) असे मृत मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
शाहूपुरीतील आंतरभारती शिक्षण संस्था ही शहरातील एक मोठी व ख्यातनाम शिक्षण संस्था मानली जाते. या संस्थेच्या वसंतराव चौगुले प्राथमिक शाळेत बुधवारी या संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्या जाधव या शाळेत 32 वर्षांपासून कार्यरत असून गेल्या सात वर्षांपासून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचीही जबाबदारी आहे. बुधवारी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे जाधव आपल्या सहकारी शिक्षिकेसमवेत शाळेत आल्या. येताना त्यांनी कार्यशाळेसाठी गुलाब फुलेही घेतली. कार्यशाळा सुरू झाल्यानंतर गुलाब फुले देऊन उपस्थितांचे स्वागतही त्यांनी केले.

निमित्त पर्स राहिल्याचे
कार्यशाळा सुरू झाल्यानंतर ‘माझी पर्स राहिली आहे, ती घेऊन येते’ असे सांगून विद्या जाधव हॉलबाहेर पडल्या. थोडा वेळ झाल्या तरी त्या परत न आल्याने इतर शिक्षिकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. तेव्हा शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरील एका वर्गात त्यांनी गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले.
आयकर दंडाच्या दबावातून आत्महत्या?
या शिक्षण संस्थेला आयकर विभागाची नोटीस आली होती. क्लार्कने वेळेत पैसे न भरल्याने संस्थेला दंड झाला होता. ही रक्कम जाधव यांनी भरावी असे आदेश संस्थेने त्यांना दिले होते. या दबावापोटीच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विद्या यांचे पती दत्तात्रय यांनी केला आहे. दरम्यान, दंडाची रक्कम संस्थेनेच भरावी असा ठराव मंगळवारीच संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे संस्थेने जाधव यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.