Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | science sahitya samelan at solapur dated 17-18 march

सोलापुरातील विज्ञान साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

प्रतिनिधी | Update - Mar 05, 2012, 01:09 PM IST

मराठी विज्ञान परिषद आयोजित पहिले विभागीय विज्ञान साहित्य संमेलन 17 व 18 मार्च रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आले आहे.

  • science sahitya samelan at solapur dated 17-18 march

    सोलापूर: मराठी विज्ञान परिषद आयोजित पहिले विभागीय विज्ञान साहित्य संमेलन 17 व 18 मार्च रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निमंत्रक डॉ. नितीन ढेपे यांनी दिली. दोन दिवस चालणार्‍या या विज्ञान साहित्य संमेलनात बाळ फोंडके, दीपक घारे, फारुक शेख, पुरुषोत्तम वेल्होर, डॉ. बालसुब्रमण्यम आदींसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा येथील विज्ञान साहित्यिकांची मांदियाळी असणार आहे. येथील गुजराती सभागृहात ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी तीन परिसंवाद, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि दुसर्‍या दिवशी ‘मराठी भाषेतील विज्ञान साहित्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. राज्यभरातून 500 प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे ढेपे यांनी सांगितले.Trending