आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: पुलाला धडकून स्कॉर्पिओ नदीत पडली; महिला ठार, 9 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर:  जिल्ह्यातील कूर  येथे मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास कोल्हापूरकडून गारगोटीकडे जाणारी स्कॉर्पिओ वेदगंगा नदीवरील पुलाला धडकून नदीच्या पात्रातील पाण्यात पडली. या अपघातात स्कॉर्पिओमधील प्रवासी सविता प्रमोद कोळी वय ३२ रा.विश्रांतवाडी, पुणे या जागीच ठार झाल्या. तर अन्य 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या अपघाताची गारगोटी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी अपघातातील मयत आणि जखमी हे आपल्या गारगोटी ता. भुदरगड जि.कोल्हापूर येथील पाहुण्यांच्या घरी जात होते. कोल्हापूरकडून गारगोटी कडे जाणाऱ्या मार्गावर कुर गावाजवळ वेदगंगा नदीच्या पुलाजवळ स्कॉर्पिओ आली असता अचानक वाहन चालकाचा स्कॉर्पिओ वरील ताबा सुटला आणि स्कॉर्पिओ पुलाच्या कठड्यावर जावून धडकली. आणि त्यानंतर नदीच्या पाण्यात पडली.
 
या अपघातात सविता प्रमोद कोळी या जागीच ठार झाल्या. तर अन्य 9 जण किरकोळ जखमी झाले.  अपघाताची माहिती गारगोटी पोलिसांना कुर गावचे पोलीस पाटील युवराज बाळासो धोंगडे, रा.कुर यांनी दिली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी सविता कोळी यांचा स्कार्पिओमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढला, तसेच अन्य जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाकडे पाठवले. या दुर्घटनेचा अधिक तपास गारगोटी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार डी. डी. मांगले करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...