आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् दुपारीच उतरवला देशातील दुसरा सर्वात उंच राष्ट्रध्वज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरात सध्या ताशी 20 किमी भन्नाट वेगाने वारे वाहत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलेला कोल्हापुरात उभारण्यात आलेला देशातला दुसरा सर्वात उंच राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला आहे. राष्ट्रध्वजाची देखभाल करणारे एनजीओ केएसबीपीने ही माहिती दिली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून कोल्हापुरात सायंकाळच्या वेळेला वादळी पाऊस पडतो आहे. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाऱ्याचा वेग जास्त असतो. ध्वजाचे कापड वॉटरप्रूफ कापड आहे. त्यामुळे, पावसाचा कोणताही परिणाम या ध्वजाच्या कापडावर होत नाही. तरीही, ध्वज वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे जोरात फडकत असल्याने स्तंभावर लावण्यात आलेल्या तांब्याच्या स्प्रिंग खराब होत आहेत. यासोबतच ध्वजाला लावण्यात आलेल्या रिंग सुद्धा खराब झाल्याने एक ध्वज आत्ताच खराब झाले.
 
मुंबईहून मागवले होते राष्ट्रध्वज
मुंबईतील फ्लॅग इंडिया कंपनीकडून असे पाच ध्वज मागवण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक खराब झाला आहे. एका 60*90 फुटाच्या ध्वजाची किंमत जवळपास 70 हजाराच्या घरात आहे. अन्य ध्वज अशा पद्धतीने खराब होऊ नये म्हणून येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाच मजली इमारतीवर वाऱ्याचा वेग तपासणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याच्या आधारावर वाऱ्याचा वेग तपासून मगच हा ध्वज फडकवला जाणार आहे.
 
कायम फडकवण्यासाठी विचार सुरू
देशातल्या दुसऱ्या महाकाय राष्ट्रीय ध्वजाची कीर्ती अल्पावधीतच संपूर्ण देशात पसरली आहे. 
जिल्हा पोलीस प्रशासन आणि एनजीओ केएसबीपीने यावर कायमचा उपाय शोधून हा राष्ट्रीय ध्वज कायमस्वरूपी कोल्हापूर येथे डौलाने फडकत रहावा म्हणून प्रयत्न करावा अशी मागणी केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...