आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Send Report Of Unseasonal Rain : Pantangrao Kadam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अवकाळी’च्या नुकसानीचा अहवाल पाठवा :डॉ. पतंगराव कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- अवकाळी पावसाने राज्यात नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी दिली.


सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आणि अवकाळी पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, की ‘आधीच दुष्काळी परिस्थिती असताना राज्यात अवकाळी पावसाचे नवे संकट उभे राहिले आहे. या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन तयार आहे. दुष्काळी जिल्ह्यांत पाणी, चारा आणि वीज देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्यात एकीकडे दुष्काळी स्थिती असताना प्राध्यापकांनी शासनाला वेठीस धरून बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकू नये. शासनाशी चर्चेतून मागण्या सोडवणे शक्य आहे.’


गावांना कुंपण घाला
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांमुळे परिसरातील गावांतील शेतक-या चे नुकसान होत असल्याची तक्रार माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. यावर डॉ. कदम यांनी वन्यजीवांपासून नुकसान होत असलेल्या गावांभोवती प्रायोगिक तत्त्वावर कुंपण घालण्याच्या सूचना वनाधिका-यांना दिल्या.