आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Left Leader Comrade Govind Pansare Attacked In Kolhapur

कॉम्रेड पानसरेंवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पाच संशयित अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे (७८) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या वेळी खाली कोसळलेल्या उमा पानसरे (७०) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळीच या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.

पानसरे पत्नीसह सकाळी फिरायला गेले होते. शिवाजी विद्यापीठ परिसरातून घराकडे परतत असताना प्रतिभानगरजवळ आयडियल कॉलनीच्या दिशेने पानसरे यांच्या बंगल्यासमोरून येणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पानसरेंना गोळ्या घातल्या. सहापैकी तीन गोळ्या पानसरेंच्या शरीरात घुसल्या. ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. या धक्क्याने उमा पानसरेही कोसळल्या.
हा प्रकार पानसरेंच्या शेजारी राहणाऱ्यांनी आरडाआेरड केल्यावर मुकुंद कदम यांच्या लक्षात आला. कदम हे पारसरेंच्या स्नूषा मेधा यांचे बंधू आहेत. पानसरे डोके धरून बसलेले व त्यांच्या पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यावर तातडीने त्यांना जवळच असलेल्या अॅस्टर आधार या सुसज्ज इस्पितळात दाखल करण्यात आले. पानसरे यांच्यावर दिवसभरात तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. यातील एक गोळी मानेत, तर दुसरी छातीच्या डाव्या बाजूला व तिसरी गुडघ्याखाली होती. या शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्या असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले. उमा यांच्या डोक्याला मार लागला असल्याने मेंदूत थोडा रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या उपचाराला पडल्याचे पाहिल्यावर तातडीने त्यांना जवळच्या अॅस्टर आधार इस्पितळात दाखल करण्यात आले. पानसरे यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. यातील एक गोळी मानेत, तर दुसरी छातीच्या डाव्या बाजूला तिसरी गुडघ्याखाली होती. या शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्या असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले. उमा यांच्या डोक्याला मार लागला असल्याने मेंदूत थोडा रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टर म्हणाले.

गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीवर चप्पलफेक
पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच अनेक कार्यकर्ते इस्पितळाच्या आवारात जमले. साडेचारच्या सुमारास राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे इस्पितळात आले. तेव्हा जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. महाराष्ट्र शासन व हिंदूत्ववादी संघटना तसेच गोडसे समर्थकांचा कार्यकर्त्यांनी धिक्कार केला. राजू शेट्टी यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. महिलांनीही मंत्र्यांच्या गाडीभोवती कडे केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंत्र्यांना मागच्या बाजूने बाहेर काढले. या वेळी कार्यकर्त्‍यांनी गाडीवर लाथा मारून चप्पलफेकही केली.
हल्ल्याविषयी आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...