आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Left Leader Comrade Govind Pansare Attacked In Kolhapur

हल्लेखोरांनी आधी विचारला पत्ता, मग घातल्या गाेळ्या !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर हल्ला करणाऱ्या अाराेपींचा दुसऱ्या दिवशीही शाेध घेण्यात पाेलिसांना यश अालेले नाही. उमा यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने पाेलिसांनी मंगळवारी त्यांचा जबाब घेऊन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुचाकीवर अालेल्या अज्ञात हल्लेखाेरांनी अाधी एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उमा पानसरे यांच्याशी संवाद साधला व नंतर गाेळ्या झाडल्याची माहिती समाेर अाली अाहे.
पानसरे दांपत्यावर सध्या काेल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पानसरेंवर हल्ला करणाऱ्या अाराेपींनी तोंड बांधले होते की नाही याबाबत अजूनही संभ्रमावस्था अाहे. दुचाकीवर अालेल्या दाेघांनी तोंड बांधले होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे होती. मात्र अन्य ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार, अाराेपींनी तोंड बांधले नव्हते अशीही माहिती पुढे येत आहे. दाेघा अाराेपींनी उमा पानसरे यांच्याकडेच अन्य एका बाेगस व्यक्तीचे नाव घेऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला होता. त्यांनी येऊन पानसरेंवर गोळीबार केला, अशी माहितीही समाेर येत असून पाेलिस त्याबाबत खातरजमा करत अाहेत. दरम्यान, सोमवारी ताब्यात घेतलेल्या पाच संशयीतांकडूनही पोलिसांना ठोस माहिती मिळू शकली नसल्याने सूत्रांनी सांगितले.

कुत्रा असता तर..
ही घटना ज्यांच्या बंगल्यासमोर घडली ते दुधाणे कुटुंबीय परगावी गेले होते. त्यांचा कुत्रा कोणीही अनोळखी व्यक्ती परिसरात दिसला की तर जोरात भुंकतो. मात्र गावी जाणार असल्याने दुधाने यांनी कुत्र्याला आत बांधून ठेवले होते. हा कुत्रा जरी बाहेर असता तर परिस्थिती वेगळी असती असे स्थानिक नागरिक सांगतात.

एअर अॅम्ब्युलन्सची साेय : पाटील
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सकाळी रुग्णालयात जाऊन पानसरेंच्या तब्येतीची चौकशी केली. पानसरे दांपत्यावरील उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असून गरज पडल्यास त्यांना पुणे किंवा मुंबईला नेण्यासाठी शासनाने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केल्याचे पाटील यांनी सांगितले. डॉक्टरांचे पथक चांगल्या पद्धतीने उपचार करत अाहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने केला जाईल असेही त्यांनी सांगितले.