आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Left Leader Govind Pansare Attacked In Kolhapur

पानसरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण, पाच संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावरील दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. पानसरे यांच्या डाव्या खांद्यातील गोळी बाहेर काढण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे पानसरे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना लवकरच आयसीयूमध्ये हलवण्यात येणार असल्याचे सूत्रांन‍ी सांगितले.
दुसरीकडे, कॉ. पानसरेंवरील हल्ल्याप्रकरणी पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पाचही जणांची कसून चौकशी करत आहेत. पानसरे यांच्या छातीबरोबरच पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांच्या मेंदुला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांना काहीही इजा झाली नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात दुपारी चारनंतर पुढील माहिती देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी सुमारे नऊ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी झटापटीत त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी उमा पानसरे खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला जबर दुखापतही झाली. दरम्यान हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात बाजारपेठा बंद करण्यास सुरुवात झाली आहे.
हल्ल्यावेळी कॉम्रेड पानसरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उमा होत्या. पानसरे यांना वाचवताना त्या खाली पडल्या व डोक्याला मार लागल्याने जखमी झाल्या. मात्र त्या धोक्याबाहेर आहेत. पानसरे यांच्या शरिरात एक गोळी असून, दुपारी एकच्या सुमारास पुढील माहिती दिली जाणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील सागरमळा येथील घराजवळच पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर हा हल्ला करण्यात आला आहे. मोटारसायकलसवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. कोल्हापुरात डाव्या चळवळीची सुरुवात करण्याचे श्रेय हे गोविंद पानसरे यांना जाते. पानसरे यांनी टोलविरोधी आंदोलनातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर कामगार, मोलकरणी यांच्यासाठी गोविंद पानसरे यांनी अनेक लढे उभारले आहेत. त्याचबरोबर बालशिक्षणासाठीची चळवळही पानसरे यांनी चालवली आहे. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणे त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा या हल्ल्यानंतर सुरू झाली आहे.
हल्ल्याची पद्धत दाभोलकरांवरील हल्ल्याप्रमाणेच
पुण्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला होता, त्याच पद्धतीने पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर हल्ला करण्यात आला आहे. दाभोलकरांवर सकाळी मॉर्निंग वॉकहून परतताना गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला होता. त्याचप्रमाणे पानसरे यांच्यावरही सकाळी मॉर्निंग वॉकहून परतताना हल्ला करण्यात आला आहे. तसेच पानसरे यांनाही दाभोलकर यांच्या प्रमाणे मानेत गोळ्या झाडल्या असल्याचे दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर सर्वच पक्षातील नेत्यांना धक्का बसला असून सर्वानीच या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून लवकरच माहिती मिळेल अशी शक्यता कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही या बातमीने धक्का बसल्याचे म्हटले आहे.
हल्लेखोर पकडण्यासाठी नाकेबंदी
हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण कोल्हापुरात नाकेंबंदी करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, अत्यंत वेगाने तपास करत आहेत. लवकरच हल्लेखोरांना पकडण्यात यश येईल असे शिंदे म्हणाले आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, हल्ल्यानंतर कोण काय म्हणाले... बघा गोविंद पानसरे यांचे पत्नीसोबतचे छायाचित्रे... त्यांच्या राहत्या घराची पाटी...