आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर \'सिरिअल किलर\'प्रकरणी संशयीत व्यक्तीला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला झोपलेले भिकारी तसेच बेवारसांना दगडाने ठेचून ठार मारणाल्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी रात्री एका संशयीत व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरूवारी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या आलेल्या संशयीत सिरियल किलरचे नाव दिलीप लेहरिया असे आहे. तो छत्तीसगडमधील रहिवासी आहे.

दरम्यान, रिलायन्स मॉलशेजारी बुधवारी सकाळी वृद्ध भिकारी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच यापूर्वी अशाच प्रकारे शहरात हत्या करण्यात आल्या होत्या. या घटनांमागे सिरियल किलर असण्याचा संशय असून त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

गेल्या चार महिन्यांत दहा भिका-याचा खून झाला असून पोलिस रेकॉर्डला मात्र पाचच खुनांची नोंद आहे. रिलायन्स मॉलशेजारी असलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव शकुंतला महादेव जाधव असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती भीक मागूनच तिचा उदरनिर्वाह करत होती.

डॉक्टरांकडे चौकशी
या खूनसत्रामुळे शहरातून सर्व भिकारी गायब झाले आहेत. पोलिसांनी त्यांना एकत्र करून कोल्हापूरबाहेर पाठवून दिले आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले असून त्यांनी विजापूरपर्यंत धडक मारली. एखाद्या माथेफिरूचे हे कृत्य असण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील मानसोपचारतज्ज्ञांकडेही याबाबत चौकशी आहे.