कोल्हापूर- तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ७ जण ठार, तर ६ जण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावरील म्हसोबा हिटणी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी घडली.
मृतांत रमेश पाटील (४०), बाबू पाटील (५५), महादेव पाटील (५०), शंकर कुंभार (४५), बाबू कुंभार (५०), डॉ. कृष्णा मोरे (५०), खेनू बडीगेर (६०) यांचा समावेश आहे. मृत सर्व अंकली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अंकली येथील १३ जण शनिवारी ज्योतिबा दर्शनासाठी एका गाडीने निघाले होते. दर्शन घेऊन परत येताना सर्वांनी घाटावरील ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर हे सर्वजण संकेश्वरमार्गे गावाकडे निघाले. या वेळी हिटणी फाट्याजवळ भाविकांची गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेला धडकल्यानंतर एका मालवाहू ट्रकला जाऊन धडकली.