आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीत सात सावकार अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सावकारांविरोधात तक्रारी करण्यास लोक पुढे आल्याने सांगलीतील सात सावकारांना पोलिसांनी अटक केली .
कर्जापोटी जमिनी लाटल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सावकारांविरोधात मोहीम राबवून आतापर्यंत सात जणांना अटक केली. सावकारांच्या धमक्यांना भिऊन मंदार गोखले हा गायब झाल्याची तक्रार मंगळवारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन सावकारांना अटक केली. मंदारच्या चुलत्याने प्रशांत पाटीलकडून 2011 मध्ये पाच लाखांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी व्याजासह 6 लाख तर मंदारने 3 लाख 70 हजार रुपये दिले आहेत. तरीही यांच्याकडून आठ कोरे धनादेश, आठ कोर्‍या स्टॅम्पपेपरवर सह्या घेतल्या आहेत.एवढे करूनही पैशांसाठी सावकार धमक्या देत असल्याने मंदार हा दोन दिवसांपासून गायब झाला आहे.