आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : साश्रूनयनांनी शहीद माने यांना निरोप, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव / कोल्हापूर - पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कुंडलिक माने यांच्यावर आज (गुरुवार) त्यांच्या गावी पिंपळगावमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी पिंपळगाव पंचक्रोशीसह कोल्हापूर जिल्ह्यातून नागरिक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यासोबतच गृहमंत्री आर.आर.पाटील, भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, गृहराज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

माने यांच्यासोबत पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील चार जवानांवर बुधवारी त्यांच्या-त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले गेले आहेत. मात्र, नितीशकुमार सरकारमधील एकाही मंत्री तिथे उपस्थित नव्हते. यामुळे तेथील जनतेत रोष आहे.

शहीद नायक प्रेमनाथ सिंह यांच्यावर छपरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. छपराचे आमदार आणि नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान मंत्री असलेले गौतम सिंह यांनी देखील अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे ते त्यावेळी छपरामध्येच होते.
.

लोकप्रतिनिधींना रोखले

ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी गावात आले, परंतु त्यांनाही गावकर्‍यांनी कुटुंबीयांना न भेटण्याची विनंती केली. गावातील हालचाली पाहता माने कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी पोलिस पाटील, सरपंचांना विचारले, तेव्हा कुंडलिक जखमी झाला असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.