आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दंगल - इतिहासातील अज्ञानावरुन शरद पवारांचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर गुजरात दंगलीवरुन हल्लाबोल केला आहे. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत त्यांनी मोदींना देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास माहित नसल्याचाही टीका केली.
ते म्हणाले, 'इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, यांच्यासह अनेक नेत्यांचे दिल्लीत सरकार पाहिले आहे. त्यांच्या निवडणुका देखील जवळून पाहिल्या आहेत. मात्र निवडणुकीआधीच पंतप्रधान कोणत्याही पक्षाने घोषित केला नव्हता. तो पराक्रम एका व्यक्तीसाठी भाजपने केला आहे. ' मोदींचे नाव न घेता ते म्हणाले, पंतप्रधान होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास माहित नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदींच्या इतिहासाची कीव करताना पवार म्हणाले, ' ज्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायचे आहे, त्याला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास माहित नाही. त्याच्या हाती देशाची सत्ता द्यायची का? हा खरा प्रश्न आहे.' नरेंद्र मोदींनी नुकताच विदर्भातील वर्ध्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी गांधीजींची कर्मभूमी सेवाग्रामलाही भेट दिली. त्यावेळी त्यांनी वर्ध्यातून गांधीजींनी 'चले जाव'ची घोषणा दिल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन पवारांनी मोदींच्या इतिहासातील अज्ञानावर सडकून टीका केली. गांधीजींनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात इंग्रजाविरोधात 'चले जाव'ची घोषणा दिल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरात दंगलीबद्दल पवार म्हणाले, 'काँग्रेसच्या मुस्लिम समाजाच्या एका खासदारासह 20 लोकांना गुजरातमध्ये जीवंत जाळले. त्यांच्या घरी जाऊन साधी चौकशी कराण्याचे सौजन्य तिथल्या मुख्यमंत्र्याने दाखविले नाही, त्याच्या हातात देशाचे भविष्य कसे असेल, असा सवाल पवारांनी उपस्थि केला.
नवी मुंबईत रविवारी पवारांनी दोनदा मतदान करण्याचा सल्ला देणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यावर आज ते काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. मात्र, पवारांनी त्याबद्दल बोलणे टाळले. विशेष म्हणजे, त्यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात साता-याचा उल्लेख केला होता. त्यानंतर लागलीच आज ते सातारमध्ये आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, महायुती सात-याचा उमेदवार बदलणार