आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी गुजरातेत विकास करू शकले नाहीत - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - देशाचे पंतप्रधान होऊन विकासाचे स्वप्न पाहणारे मोदी गुजरातचाही विकास करू शकले नाहीत. काँग्रेसच्या सोळंकी, चिमणभाई पटेल यांच्या काळात विकासाचा दर 17 टक्के होता. मोदींच्या काळात तो साडेसात टक्यांवर आला. त्यामुळे अशा भूलथापा देणार्‍या मंडळींपेक्षा जनता राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीवर विश्वास ठेवेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे व्यक्त केला.

फटलण येथील प्रचार सभेत ते बोलत होते. माढा मतदार संघाचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ना.रामराजे नाईक निंबाळकर,प्रा.जोगेंद्र कवाडे,आ.दीपक आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, गुजरात आणि महाराष्ट्र 1960 पर्यंत एकच राज्य होते. त्यानंतर गुजरातमध्ये कर्तबगार मुख्यमंत्री झाले. त्यांनी विकास करून हा दर 17 टक्क्यापर्यंत नेला. पण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे मोदी हे विसरले. उलट त्यांच्या काळात हा दर साडे सातपर्यंत आला. आपल्या राज्यात गेल्या दहा वर्षात परदेशी गुंतवणूक 2 लाख 54 हजार 624 रुपयांची झाली तर गुजरात मध्ये 36 हजार 916कोटी रुपये गुंतवले गेले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांवर जगाचा विश्वास आहे. मात्र, गुजरातवर नाही. अशा व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता सोपवली तर देशातील परकीय गुणंतवणूक थांबण्याचा धोका आहे, असेही ते म्हणाले.