आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, NCP Chief, Divya Marathi

धर्मसंसदेची विचारधारा उद्ध्वस्त करू, शरद पवार यांचा कोल्हापूरच्या सभेत इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केलेली संसद मानतो. मात्र श्रध्दास्थानांबद्दल वाद निर्माण करून माणसामाणसातील अंतर वाढवणाऱ्या धर्मसंसदेचा विचार महाराष्ट्रातील कार्यकर्ता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. कोल्हापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते.

गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेमध्ये पवार यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणामध्ये काही मुलभूत गोष्टी मांडून राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. ‘लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी अपयश आले तरी धनंजय महाडिक यांना विजयी करून कोल्हापुरकरांनी पुरोगामी विचारांची कास सोडली नाही,’ असे सांगून पवार यांनी काेल्हापूरकरांचे जाहीर आभार मानले. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळेल याची अाम्ही काळजी घेतली. ऊसाला दराची तजवीज केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात कपात केली,’ याची आठवणही पवारांनी करून दलिी. शाहू महाराजांचे विचार पुन्हा मजबूत करण्याची आता वेळ आली आहे. हे राज्य पुन्हा समर्थपणे उभारण्यासाठी, काळ्या आईची सेवा करण्याऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी, तरूणांचे भविष्य फुलवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्ता द्या, असे आवाहनही पवारांनी केले.

सत्ता द्या, सर्वांना आरोग्यविमा
राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आल्यास ६५ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन, ६० टक्के शेती ठिबक सिंचनखाली आणण्यासाठी ७५ टक्के अनुदान, सर्वांसाठी आरोग्यविमा, इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, अल्पसंख्याकांसाठीच्या आझाद महामंडळाला २००० कोटींचे बजेट करू, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सिंमेटचे रस्ते आणि गटर्स करू अशी ग्वाही पवार यांनी दिली .

ही कुठली धर्मसंसद?
साईबाबांच्या जन्माचा मुद्दा काढून श्रध्दास्थानांविषयी वाद निर्माण करणारी ही कुठली धर्मसंसद? असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. त्यांना अधिकार कुणी दलिा हे विचारतानाच, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराजांबाबतही अशाच धर्मसंसदेने काही निर्णय घेतले होते. परंतु राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशी विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी बाेलून दाखवला.

माझी सटकली : अजित पवार
खाेटी अाश्वासने देऊन माेदी सरकार सत्तेवर अाले. मात्र, शंभर िदवसांत त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे ‘अाता माझी सटकली, मला राग येताेय’, असे जनता म्हणत अाहे. पुन्हा सत्ता आल्यास राज्यातील राहलिेले प्रश्न १०० दिवसांत सोडवतो, काेल्हापूरचा टाेलही रद्द करताे, अंबाबाईच्या साक्षीने मी हे सांगताे अाहे,’ अशी घोषणा अजित पवारांनी केली.

घड्याळाचा गजर करा : तटकरे
माेदी सरकारने शंभर दिवसांत काय केलं हे सर्वांसमोर आलं आहे. म्हणूनच सर्वसामान्य, दीनदलित, वंचितांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर राज्यभर होऊ द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत तर भाजपमध्येही लाइन लागल्याचे ते म्हणाले.

मुंडेंचे काय झाले : भुजबळ
पीयूष गाेयल, गडकरी, जावडेकर अशी केंद्रातील मंत्र्यांची नावं. भाजपच्या कार्यकारिणीतही महाजन, सहस्रबुद्धे आहेत. पाशा पटेल, फुंडकर ही नावे का नाहीत? गोपीनाथ मुंडे यांना कसेतरी मंत्रिपद िदले. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजून कसा आला नाही?’ असा सवाल छगन भुजबळांनी केला.