आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी दिली नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर ही प्रतिक्रिया; अमित शहांना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना माजी कृषीमंत्री शरद पवार. - Divya Marathi
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना माजी कृषीमंत्री शरद पवार.
कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात आपल्या मार्मिक शब्दात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार हे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी परिसरातल्या निवासस्थानी आले होते. गेल्या काही दिवसांपासून एन. डी. पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला पवार यांनी दिला. यावेळी तेथेच आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.
 
अमित शहा यांचे गुजरातमध्ये उद्योगधंदे आहेत हे मला माहिती होते पण आता अमित शहा यांनी पंचांग घेऊन भाकीत सांगण्याचा नवा व्यवसाय सुरू केला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच सरकारमध्ये मंत्री कोण असावे, कोण नसावे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात असा इतिहास आहे पण या घोषणा सध्या कोल्हापुरातूनच होतात असा टोला महसूल चंद्रकांत पाटील यांना पवारांनी लगावला.
 
राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस आहे. परंतु अद्याप धरणं भरलेली नाहीत किमान आताच्या काळात धरणे भरणं गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
राजू शेट्टी यांच्यासोबत मी संसदेत काम केले आहे पण इतर कोणी मला माहिती नसल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेखही करणेही शरद पवार यांनी टाळले. स्वाभिमानीचे आंदोलन महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील आंदोलन असल्याची टीका देखील त्यांनी केली. ना खायेंगे ना खाने देंगे ही परिस्थिती सध्या भाजप सरकारमध्ये राहिली नसल्याचे सांगत पवारांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शुभेच्छासुद्धा दिल्या.
 
बातम्या आणखी आहेत...