आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shetkari Sanghtana Leader Raghunathdadada Patil Arrested

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना शिवीगाळ करून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अटक केली.

दरम्यान, या प्रकारानंतर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. चांदोली धरणग्रस्तांचे वाळवा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साखराळे येथील सहा पुनर्वसनग्रस्तांना शासनाने जमीन दिली आहे. त्यांच्या नावे सात-बाराही निघतो; मात्र 20 वर्षांपासून त्यांना संबंधित शेतकर्‍यांनी जमिनीचा ताबा दिलेला नाही. याबाबतच्या तक्रारीवर सुनावणीसाठी सहावेळा तारखा दिल्या गेल्या; मात्र तारखांदिवशी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनीषा कुंभार या गैरहजर राहतात, अशी या शेतकर्‍यांची तक्रार आहे. त्यामुळे पाटील यांनी कुंभार यांना शिवीगाळ करत शिपायाला मारहाण केली होती.