आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिराळ्यात नाग पकडणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - बत्तीसशिराळा येथे नागपंचमीसाठी नाग पकडणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यासाठी वन विभाग आणि पोलिसांचे पथक तपासणी करेल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी गुरुवारी दिली.
बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र या अघोरी प्रथेला सांगलीतील निसर्ग प्रतिष्ठान या संस्थेने न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने नागांची जिवंत पूजाच नव्हे तर नाग पकडण्यालाही मनाई केली आहे. तसेच या प्रश्नात राज्य शासनाने हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा, असा निकाल दिला होता.
तेव्हापासून नागांची मिरवणूक काढण्याच्या प्रथेला काही प्रमाणात आळा बसला. शासनाने लोकभावनेचा विचार करून फक्त ग्रामदेवता अंबाबाई मंदिरात नागपुजनाला परवानगी दिली होती. पण अजुनही कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून काही मंडळे नाग पकडून त्याचे जाहीर प्रदर्शन करत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी शिराळ्यातील ग्रामस्थ, अंबाबाई देवस्थान समितीचे विश्वस्थ यांची बैठक घेऊन जिवंत नाग पकडणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नागपंचमीपूर्वी 15 दिवस आधी ही मंडळे नाग पकडतात.