आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिराळ्यातील नागपंचमीबाबत सांगलीचे जिल्हा प्रशासन आक्रमक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- जिल्ह्यातील बत्तिस शिराळा येथे नागपंचमीसाठी जीवंत नागांची पुजा करण्यास परवानगी देण्यास जिल्हा प्रशासनाने आज नकार दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपंचमी साजरी करत असल्याचे प्रतिज्ञापत्र गावकरयांनी लिहून द्यावे, अशी अट जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी घातली.
नागपंचमीला जीवंत नागांची पुजा करण्याची शिराळा येथे गेल्या काही वर्षांपासूनची प्रथा आहे. याला सांगलीतील निसर्ग प्रतिष्ठान या संस्थेने न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने 2002 मध्ये दिलेल्या अंतरीम आदेशात नाग पकडायला आणि त्यांचे जाहीर प्रदर्शन करायला परवानगी नाकारली आहे. तरीही लोकभावनेचा आदर करत जिल्हा प्रशासनाने काही बंधने घालत नागपंचमी सादर करायला शिराळकरांना परवानगी दिली होती.
मात्र गेल्या दहा वर्षांत शिराळकरांनी ही बंधनेही पाळली नाहीत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आक्रमक झाले आहे. जिल्हाधिकारयांनी परवा झालेल्या बैठकीत नाग पकडणारया मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. आज शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजीत देशमुख यांच्या उपस्थितीत नाग मंडळांच्या पदाधिकारयांची पुन्हा बैठक झाली. यात जिल्हाधिकारी वर्धने यांनी सर्व मंडळांनी आणि शिराळ्याच्या ग्रामस्थांनी यावर्षी न्यायालयाच्या निकालाचा आदर करून नागपंचमी साजरी करण्याचे प्रति?ापत्र लिहून द्यावे, अशी ठाम भूमिका घेतली.