आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leader Ramdas Kadam Comment On Udayanraje

उदयनराजेंची निशाणी ‘बाटली अन् ग्लास’, शिवसेना नेते रामदास कदम यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘ढाल आणि तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. मात्र राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची निशाणी काय तर बाटली आणि ग्लास!,’ अशी टीका करतानाच ‘महाराजांचा आदर्श घ्या, गोरगरिबांची कामे करा,’ असा सल्लाही शिवसेना नेते रामदास कदम यांनी उदयनराजेंना दिला. सातारा येथील जाहीर सभेत शुक्रवारी ते बोलत होते.
महायुतीची जाहीर सभा शहरातील तालीम संघाच्या मैदानावर झाली. या वेळी आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, रिपाइंचे अशोक गायकवाड, भाजपच्या कांता नलावडे, रासपचे बजरंग खटके आदी उपस्थित होते. या वेळी कदम म्हणाले की, मुसलमानांच्या मतांसाठी आघाडीतील पक्ष लाचार झाले आहेत. अफजल खानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही ते काढले जात नाही. सच्चर समितीचे भूत नाचवले जात आहे, पण मुस्लिमांची गरिबी हटवण्यासाठी या लोकांनी नक्की काय केले, हे तरी सांगावे.

पुढील स्लाइडमध्ये, आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही

छायाचित्र - उदयनराजे भोसले