आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MLA Kshirsagar Arrested In The Connection Of Lady Police Officer Molestation

महिला पोलिस अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना आमदार क्षीरसागर अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पोलिस अधिका-याचा विनयभंग व अन्य आरोपांवरून गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी स्वत:हून अटक करवून घेतली. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.


गुरुवारी क्षीरसागर बुधवार पेठेतील त्यांच्या घरापासून मोर्चासोबतच जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये आले. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजीत मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगवे झेंडे, क्षीरसागर यांना पाठिंबा देणारे पोस्टर्स आणि घोषणांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. जिल्हा पोलिस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांच्यासह 16 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.


कोल्हापूर बंद
क्षीरसागर यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी टोलविरोधी कृती समिती, व्यापारी महासंघ यांच्यासह अनेक संघटनांनी पोलिस अधीक्षकांना निवेदने दिली होती. त्यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे तसेच व्यापा-यांनीही बंदचा निर्णय घेतल्याने शहरातील बहुतांश दुकाने संध्याकाळपर्यंत बंद होती. अनेक शाळांना अघोषित सुटी देण्यात आली.