आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sene Dispute Issue Blame Sanjay Pawar At Kolhapur

दिनकर रावतेंमुळेच शिवसेनेमध्ये फूट : संजय पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- संपर्कनेते दिवाकर रावते यांच्यामुळेच कोल्हापूर शिवसेनेत फूट पडल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी केला. चारच दिवसांत पक्षाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून यानंतरच आपली पुढची दिशा ठरेल, असे ते म्हणाले. सोमवारी शिवसेनेच्या बैठकीवेळी आमदार राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यातील वाद उफाळून आला. यावेळी पवार यांच्या सर्मथकांनी रावते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांवर टीका केली. तर रावते यांनीही आरोप फेटाळत आपल्या कारकीर्दीत युतीचे सहा आमदार निवडून आल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर पवार म्हणाले की, रावतेंमुळे आमदार निवडून आले नाहीत तर आम्ही गेली 25 वर्षे शिवसेना वाढवली आहे याचे हे फळ आहे. त्यांना मुंबईत नगरसेवक का निवडून आणता आले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.