आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवराज्याभिषेक : प्रशासन झुकले रायगडावरील जमावबंदी आदेश अखेर मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शिवप्रेमींच्या तीव्र भावनांपुढे माघार घेत अखेर राज्य सरकारने रायगड येथे 6 जून रोजी होणार्‍या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर बजावण्यात आलेला जमावबंदी आदेश मागे घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान पसरले असून या दिवशी रायगडला जाणार्‍या शिवप्रेमींच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून समितीच्या वतीने दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठय़ा दिमाखात रायगडावर साजरा करण्यात येतो. छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यक्रमाचे नियोजन होत असते. दरम्यान, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 6 जूनपूर्वी न हटवल्यास तो आम्ही उद्ध्वस्त करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता.

या पार्श्वभूमीवर महाड पोलिसांनी शिवराज्याभिषेक समितीच्या सदस्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावल्या होत्या. तसेच वाघ्या पुतळय़ाच्या संरक्षणाची जबाबदारी समितीवर टाकली होती, परंतु या प्रकरणात समितीचा काहीही संबंध नसून पुतळा हटवण्याबाबत शासनाने भूमिका घ्यावी, असे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

नोटिशीमुळे संतापाची लाट

दरम्यान, प्रशासनाने समितीला अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याआधीही मेघडंबरीमध्ये शिवपुतळा बसवतानाही केंद्र शासनाने शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ चालवला होता. त्यामुळे या जमावबंदीच्या आदेशाविरोधात ठिकठिकाणी बैठका झाल्या. शिवप्रेमींना हात लावण्याआधी मला अटक करावी लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

पाच हजारांची नोंदणी

शिवप्रेमींच्या विरोधाची दखल घेत अखेर प्रशासनाने रायगडावरील जमावबंदीचा आदेश मागे घेतल्याने 6 जून रोजी रायगडावर सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. आतापर्यंत रायगडावर जाण्यासाठी कोल्हापुरातील जुन्या राजवाड्यामध्ये 5 हजार शिवप्रेमींनी नोंदणी केली असून 40 एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
शहाणपणाचा निर्णय
6 जून रोजी रायगडावर लागू केलेला जमावबंदी आदेश रद्द करण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय शहाणपणाचा असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचे वातावरण क लुषित न होता हा सोहळा पार पडावा यासाठी आम्ही एकीकडे प्रयत्न करत असताना जमावबंदी लादणे अपेक्षितच नव्हते, असेही ते म्हणाले.
रायगडावर आज शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त...