आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्‍या दौऱ्यावर, शेतक-यांशी साधणार संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्‍या पश्चिम महाराष्ट्राच्‍या दौऱ्याला सुरुवात करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्‍ताने 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आत्तापासूनच कामाला लागल्याची चर्चा आहे. आज शुक्रवारी प्रथम कोल्हापूर, उद्या 25 नोव्हेंबर रोजी सांगली आणि 26 रोजी सातारा या जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. यानिमित्‍ताने उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा, शेतकरी, व्यापारी तसेच कामगारांशी संवाद, पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

आज सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी या गावी शेतक-यांशी संवाद साधला. त्यानंतर दिवसभरात उद्धव ठाकरे यांच्या तीन जाहीर सभा कोल्हापूर जिल्ह्यात होणार आहेत.


मागील विधानसभेच्या निवडणुकीत एकट्या कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेचे 10 पैकी 6 आमदार निवडून दिले होते. त्‍यामुळे आगामी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभुमीवर पश्चिम महाराष्ट्राकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेच्या स्थानिक पक्षसंघटनात आलेली मरगळ झटकून यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...