आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता द्या, कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणून दाखवतो : उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- ‘राज्याची सत्ता एकहाती शिवसेनेकडे द्या, त्यानंतर कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणून दाखवताे की नाही बघा,’ असे अावाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेत केले. असे असले तरी मुख्यमंत्रिपद हे माझे स्वप्न नाही, मात्र शेतकऱ्यांच्या अाक्राेशाकडे लक्ष देण्याची गरज अाहे,’ असेही ते म्हणाले. कोल्हापूरकर सारखे शिवसेनेकडे मंत्रिपद मागतात. परंतु आधीच या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले, असा टाेलाही त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला.


शुक्रवारपासून उद्धव ठाकरे दाेन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दाैऱ्यावर अाले अाहेत. चंदगडमधील शिनोली गावच्या शेतकरी संवादाच्या कार्यक्रमाने त्यांच्या दाैऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर नेसरी येथील सभेत ते बाेलत हाेते. ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटकचा मुख्यमंत्री कानडी भाषा आलीच पाहिजे असे ठणकावून सांगतो. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी आलीच पाहिजे,असे सांगत नाही यासारखे दुर्दैव नाही. शिवसेना नेहमीच सीमाभागातील मराठी बांधवांच्यामागे ताकदीने उभी राहिली आहे. यापुढेही त्यांना बळ देण्याचे काम करू. केवळ एखाद्या सभेला भगवे स्वरूप न आणता आता शिवसेनेला राज्याची संपूर्ण सत्ता द्या आम्ही कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

 

बातम्या आणखी आहेत...