आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीला नाव शिवरायांचे आणि कृती मात्र अफजल खानाची; कोल्हापुरात शिवसेनेचा ढोल मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर– राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या संभ्रमावस्थेतून बाहेर काढून सत्य समोर आणण्याच्या मागणीसाठी आज (सोमवारी) कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ढोल मोर्चा काढण्यात आला. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.चव्हाण यांना आपल्या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

थील बी.टी.कॉलेजपासून जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ढोल वाजवत मोर्चा काढला. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चा आल्यानंतर शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचा धिक्कार केला. जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.ढोल वाजवून राज्यसरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले की राज्यसरकारने शेतकरयांसाठी कर्ज माफी केलेली नाही तर ही कर्जाची वसुली सुरु आहे.

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला जरी शिवाजी महाराजांचे नाव दिले असले तरी सरकारची प्रत्यक्षात सुरु असलेली कृती मात्र अफजल खानाची कृती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटर सारख्या समाज माध्यमांद्वारे कर्जमाफीची फसवे आकडेवारी देत आहेत.कारण त्यांनी जाहीर केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जमाफी आणि प्रत्यक्षात असणारी आकडेवारी यांच्यात फार मोठी तफावत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेने नेमकी किती कर्जमाफी दिली आणि त्याची आकडेवारी आणि लाभधारक शेतकरी यांचा आकडा अद्याप मिळून येत नाही. राष्ट्रीय कृत बँकांना कर्ज माफीचे कोणतेही आदेश राज्यसरकारच्या वतीने प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.असे त्यांनी यावेळी सांगितले.
 जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीशिवाय इतरही शेतीपूरक कर्जांच्या थकबाकीबाबत कोणतेही निर्देश शासनाकडून मिळालेले नाहीत मग ही सरसकट कर्जमाफी कशी? त्यामुळे संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना या अवस्थेतून बाहेर काढून सत्य समोर आणावेत म्हणून आज शिवसेनेच्या वतीने ढोलताशाच्या गजरात मागणी करत आहोत की राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीचे लाभधारक शेतकरी किती,व किती रुपये शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले याबाबत जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांनी ताबडतोब बँकेसमोर फलक लावावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाप्रमुख,उपजिल्हा प्रमुख,तालुकाप्रमुख,महिला आघाडीप्रमुख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...