आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल खेळाडू मुबिन बागवानला आमदार क्षीरसागर यांनी केली 7 लाखाची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
कोल्हापूर-  येथील बिंदू चौकातील भोई गल्लीत राहणारा युवा फुटबॉल खेळाडू मुबीन सिकंदर बागवान (वय-18) हा सध्या एका जीवघेण्या रोगाशी दोन हात करत आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी लागणाऱ्या रकमेची पूर्तता होत नव्हती. अशा वेळी बागवान कटुंबियांच्या मदतीला कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर हे धावून आले आहेत. 
 
मुबिनचे वडील शहरातील गल्लोगल्लीत फिरून लिंबू विकतात. यावरच बागवान कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. घरची परस्थिती हलाकीची असल्याने मुबीनच्या आजारावर लाखो रुपये खर्च करणे त्यांना जवळपास अशक्य होते. त्याच्यावर हाडांमधील रक्त बदलण्याचे उपाय (बोन मॅरो ट्रान्सप्लांट ) टाटा हॉस्पिटलमध्ये सुचवण्यात आले होते. उपचारासाठी 15 लाख रुपयांची आवश्यकता होती. अशावेळी कोल्हापूरचे शिवसेना आमदार बागवान कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले. त्यांनी राज्य सरकारकडून 7 लाखाचा निधी मिळवून देऊन बागवान परिवाराला मोठा आधार दिला आहे. 

एवढयावर न थांबता मुबिनवरील पुढील सर्व उपचारासाठी खर्चाची जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनने उचलली आहे. शिवसेना शहर कार्यालयात आजच मुबीन सिकंदर बागवान याला आर्थिक मदत मंजुर झाल्याचे पत्र आ. क्षीरसागर यांच्या हस्ते देण्यात आले. 
 
मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा मेमोरियल ट्रस्टची मदत
मुबीन बागवान यांच्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुपये तीन लाख आणि टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुंबई या संस्थेकडून  रुपये चार लाख आर्थिक मदत आ.क्षीरसागर यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाली आहे. आज मुस्लीम बोर्डिंगचे गणी आजरेकर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, नासीर सय्यद, लियाकतभाई मुजावर, जहांगीर अत्तार, शकील बागवान, आदी उपस्थित होते.
 
गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर
आमदार राजेश क्षीरसागर हे  अशा आजारी रुग्णांना सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
दुर्धर विकारसह मेंदू, हृदय, किडनी आणि कर्करोग आदी विकाराने ग्रस्त शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन, आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...