आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात शिवसेनेचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- हिंदुधर्मावर दडपशाहीचा अवलंब करून प्रत्येक सणाला नको ते निर्बंध घालणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
 
सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बी लावण्यावर बंदी आणल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन गणेशोत्सव साजरा करताना अथवा विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचा आधार घेत डॉल्बी सिस्टीम लावायला बंदी घातली आहे. पोलिस प्रशासनाच्या केवळ हिंदू सणांच्या वेळी लादले जाणाऱ्या या दडपशाही विरोधात आज कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील पितळी गणपती मंदिरात आरती करून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा आयजी कार्यालयाजवळ येण्या आधीच पोलिसांनी शिव सैनिकांना बॅरिकेट लावून रोखले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी आसमंत दणाणून सोडला.

यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी परखडपणे पोलिसांच्या भ्रष्ट कारभारावर ओरखडे ओढत पोलिसांकडून नागरिकांवर होणारा अन्याय बंदोबस्तावर तैनात पोलिस अधिकाऱ्यांसमोरच मांडला. त्यानंतर मोर्चाची कोणासही निवेदन न देताच सांगता करण्यात आली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...