आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांविरोधात शिवसेनेचा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ‘इशरत जहॉँप्रकरणी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी भूमिका जाहीर केली आहे. शंभर कोटी हिंदूंचा अपमान करणार्‍या पवारांनी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू नयेत,’ अशी टीका करत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी पवारांच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. दुपारी चार वाजता आमदार क्षीरसागर यांच्या निवासस्थानाहून मोर्चाला सुरुवात झाली. पवार यांच्या विरोधातील घोषणांचे फलक उंचावत, त्यांच्याविरोधातील शेलक्या शब्दातील घोषणा देत शिवसैनिक शिवाजी चौकात आले.

या ठिकाणी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. या वेळी पवार यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आमदार क्षीरसागर व त्यांच्या सहकार्‍यांना ताब्यात घेतले. मोर्चामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.