आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री महालक्ष्मीला 65 तोळ्यांचा सोनेरी चंद्रहार अर्पण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - बंगळुरू येथील बांधकाम व्यावसायिक मेघापाठी राजगोपाल रेड्डी यांनी सोमवारी श्री महालक्ष्मीला 65 तोळ्यांचा 16 पदरी सोनेरी चंद्रहार अर्पण केला. देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला. नंतर हा हार देवीला घालण्यात आला. या वेळी खासदार राजमोहन रेड्डी, आमदार चंद्रशेखर रेड्डी, तिरुपती रेड्डी, अभिनव रेड्डी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी, प्रल्हाद सावंत उपस्थित होते.