आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्विजयांना देव सद्बुद्धी देवो : श्री श्री रविशंकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - सतत काहीना काही वादग्रस्त वक्तव्ये करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे कॉँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांना वोट आणि स्वार्थाच्या पलीकडे काहीच दिसत नाही. देव त्यांना सद्बुद्धी देवो, जेणेकरून ते देशहितासंबंधीही काही विचार करू शकतील, असा टोला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
श्री श्री रविशंकर यांचा बुधवारी पंढरपूर येथे सत्संग कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री श्रींनी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतले. या वेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मध्यप्रदेशात सूर्यनमस्काराला काही मुस्लिम संघटनांनी केलेल्या विरोधाबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आज देशातील लाखो मुस्लिम बांधव सूर्यनमस्कार घालून आपले आरोग्य चांगले ठेवत आहेत. अशा प्रकारे कोणी फतवा काढल्याने आपल्याच बांधवांचे चांगले स्वास्थ्य ते हिरावून घेत असल्यासारखे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली. सध्या देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर लोकांना चिरडले जात असून त्यामुळेच नक्षलवाद वाढला आहे. ज्या महात्मा गांधींनी दारूबंदीचा प्रचार केला, त्याच गांधींजींचे चित्र असणा-या नोटा घेऊन लोक दारूच्या दुकानात जातात. या महात्म्यांची छायाचित्रे आपण तिथपर्यंत घेऊन जात आहोत, याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.
श्री श्री रविशंकर यांच्‍या उपस्थित सोलापुरात रंगला रेकॉर्डब्रेक 'तालनिनाद'
कॉंग्रेसच्‍या दबावामुळेच अमेठीला जाता आले नाही- श्री श्री रविशंकर
श्री श्री रविशंकर हे ‘भाजप-संघा’चे प्लान सी - दिग्विजय सिंग