आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shushilkumar Shinde Commented About Sanatan Ban Issue

सनातनवर बंदीसाठी ना प्रस्ताव आला ना कुणी माझी भेट घेतलीः सुशीलकुमार शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- सनातन संघटनेवर बंदी घालण्यासाठीचा प्रस्तावच गृहमंत्री असताना माझ्यापर्यंत आला नसल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी कोल्हापुरात केला.
ते म्हणाले ‘पानसरे यांची हत्या होणे हे वेदनादायी आहे. मात्र, सनातनच्या बंदीबाबतच्या प्रस्तावाचा विषय माझ्यापर्यंत आला नाही. एक तर हा प्रस्ताव दिला त्या वेळी पी. चिदंबरम गृहरमंत्री होते. नंतर माझ्याकडे सूत्रे आली. परंतु गृहमंत्री देशातील प्रत्येक राज्याचे कागद आणि कागद पाहू शकत नाही. जर हा प्रस्ताव होता तर संबंधितांनी आपली भेट घेऊन त्याची माहिती दिली असती. हा महाराष्ट्र सरकारचाच प्रस्ताव होता तर याबाबत निर्णय घेणे अवघड नव्हते. मात्र, आपल्याला कुणी भेटलेही नाही,’ असे सांगताना शिंदे यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडेचे अंगुलीनिर्देश केला. आपल्या सरकारने केंद्राकडे या संघटनेवर बंदी आणण्याबाबत प्रस्ताव दिला होता, मात्र केंद्राकडून त्यावर उत्तर मिळाले नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे.