कोल्हापूर – येथील निहाल फिरोज खान उस्ताद या युवकाने महापालिकेच्या चालू पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार होण्याचा बहूमान मळविला आहे. या उमेदवाराचे वय अवघे 21 वर्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची अट ही 18 वर्षाची आहे. तर, उमेदवारासाठी 21 वर्ष वय पुर्ण असायला हवे. त्यामुळे निहालने निवडणुक लढवण्यासाठीची वयाची अट पुर्ण केली आहे. या युवकाच्या उमेदवारीवर परिसरात कुतूहल व्यक्त केले जात आहे. निहाल उस्ताद याचा जन्म 16 ऑगस्ट 1995 रोजी झाला आहे. त्यानुसार त्याचे सध्याचे वय 21 वर्ष 2 महिने आहे.
अपक्ष उमेदवारी जाहीर
विशेष म्हणजे निहाल उस्ताद याने अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला चिन्हही मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 43 जवाहरनगर-शास्त्रीनगरमधून तो अपक्ष निवडणूक लढवत आहे.
वडिल आहेत शिवभक्त
निहाल उस्ताद याचे वडिल शिवभक्त आहेत. शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. मागील चार वर्षांपासून ते मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करतात. आई-वडीलांच्या प्रोत्साहनामुळे मला निवडणुकीचा अनुभव घ्यायचा आहे असे निहाल उस्तादने सांगितले आहे.