आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Man Water Issuse Challenges ; Madhave Chitale

सामाजिक पुरुषार्थाला पाणीप्रश्नाचे आव्हान; माधवराव चितळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- ‘पाण्याशी संबंधित प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून त्यांचे आता सामाजिक पुरुषार्थालाच आव्हान आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांनी रविवारी केले. आठव्या जलसाहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार अध्यक्षस्थानी होते. भारतातील जलसंस्कृतीचा आढावा घेऊन चितळे यांनी या वेळी तुलनात्मक मांडणी केली. पाणी आहे तेवढेच आहे, परंतु त्यावर आधारित लोकसंख्येचा भार तिप्पट ते चौपटीने वाढला. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी नवी रचना शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शालिवाहनाच्या काळातही पाणी वर चढवणारे जलयंत्री असल्याचे उल्लेख आहेत. एवढी संपन्न संस्कृती असताना, भारतामध्ये जेवढी गावे आहेत तेवढेच म्हणजे लहान-मोठी पाण्याची साठवण करणारी 5 लाख ठिकाणे असतानाही व्यवस्थापनाअभावी पाणीप्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

औरंगाबादला पाण्याचे बिल 24 कोटी
औरंगाबाद महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक 32 कोटी रुपयांचे असून यातील 24 कोटी रुपये फक्त पाणी उपसण्यासाठी लागणाºया विजेवर खर्च होतात. त्यामुळे यापुढे जलसंस्कृतीबरोबरच ऊर्जा संस्कृतीकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे चितळे यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराजांचे द्रष्टेपण
देशातील संस्थानकाळात पहिला स्वतंत्र पाटबंधारे विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केल्याने या क्षेत्रामध्ये कोल्हापूरचे द्रष्टेपण लक्षात येते, असे गौरवोद्गार डॉ. चितळे यांनी काढले. शंभर वर्षांपूर्वी राधानगरीला धरण बांधून हे द्रष्टेपण महाराजांनी सिद्ध केल्याचे ते म्हणाले.