Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur municipal corporation election

सोलापूर महापालिकेसाठी 577 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

प्रतिनिधी | Update - Feb 17, 2012, 04:34 AM IST

51 प्रभागातील 102 सदस्य संख्या असलेल्या सोलापूर महापालिकेसाठी गुरुवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले.

  • solapur municipal corporation election

    सोलापूर - 51 प्रभागातील 102 सदस्य संख्या असलेल्या सोलापूर महापालिकेसाठी गुरुवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. एकूण 577 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. त्यांचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.
    मागील 10 दिवसांपासून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोेरदार फैरी झडल्या. केंद्रातील आघाडी सरकारमधील मंत्री सुशीलकुमार शिंदे व शरद पवार हेही यात मागे नव्हते. त्यामुळे गुरुवारी होणा-या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच मतदार घराबाहेर पडतील या आशेने उमेदवार व कार्यकर्ते मतदान केंद्रावर सर्व तयारीनिशी ठाण मांडून होते, परंतु 10 वाजपेर्यंत मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मात्र गर्दी वाढू लागली. शहरातील 926 मतदान केंद्रांवर सुमारे 6 हजार निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निराळे वस्ती परिसरात मतदानाच्या पूर्वसंध्येला व आज जुळे सोलापूर परिसरात झालेल्या किरकोळ वादावादीचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही मतदानास हजेरी लावली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. 95 अधिकारी, 4 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
    काँग्रेस उमेदवाराला अटक - मतदानादरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना विजापूर नाका भागात घडली. याप्रकरणी काँग्रेस उमेदवार गणेश ताकमोकेसह 5 जणांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांनी पोलिसांच्या दडपशाही विरोधात काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले.Trending