Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur municipal election counting live

सोलापुरात कॉंग्रेसचा 'सुशील' विजय

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 17, 2012, 11:11 AM IST

सोलापूर महानगरपालिकेत गुरूवारी 58 टक्‍के इतके मतदान झाले. 51 प्रभागातील 102 जागांसाठी झालेल्‍या या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी न करता स्‍वतंत्ररित्‍या निवडणुक लढवली.

 • solapur municipal election counting live

  सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेत गुरूवारी 58 टक्‍के इतके मतदान झाले. 51 प्रभागातील 102 जागांसाठी झालेल्‍या या निवडणुकीत 577 उमेदवारांनी आपले नशीब आजमावून पाहिले. कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी न करता स्‍वतंत्ररित्‍या निवडणूक लढवली. राज्‍याच्‍या इतर महानगरपालिकांमध्‍ये महायुती असली तरी सोलापुरमध्‍ये ऐनवेळेस रिपाईने स्‍वतंत्र उमेदवार उभे केले.
  कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची आघाडी न होताही कॉंग्रेसने सर्वाधिक 44 जागा जिंकल्‍या आघाडी घेतली असली तरी येत्‍या काळात ते कोणाची मदत घेऊन सत्‍ता स्‍थापन करणार आहेत हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. त्‍यांच्‍यापाठोपाठ सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजप समोर आला आहे. त्‍यांनी 27 ठिकाणी विजय मिळवला आहे. राष्‍ट्रवादीने 14 जागेवर विजय नोंदवला आहे. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्‍या शिवसेनेने आठ ठिकाणी विजय मिळवला आहे. कॉंग्रेसला सत्ता स्‍थापन करण्‍यासाठी 52 जागांची गरज असून त्‍यांना सत्‍ता मिळवण्‍यासाठी आणखी आठ जागांची गरज आहे.
  वॉर्ड क्रमांक 45 मधील लक्षवेधी ठरलेल्‍या निवडणुकीत माजी दुग्‍धविकास मंत्री आनंदराव देवकते यांचे नातू संजय शेळके यांना पराभवाचा धक्‍का बसला. भाजपचे नरेंद्र काळे यांनी येथून विजय मिळवला. भाजपच्‍या नेत्‍या मोहिनी पत्‍की यांनी नव्‍या प्रभागातही विजय मिळवला. कॉंग्रेसचे नागेश ताकमोगे यांनीही आपल्‍या प्रभागातून विजय मिळवला आहे. गेल्‍या महापालिका निवडणुकीत त्‍यांनी शिवसेनेच्‍या तिकिटावर निवडणुक लढवली होती. कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते महेश कोठे हे पुन्‍हा एकदा निवडून आले.
  सोलापुरात अनेक प्रस्‍थापितांना पराभवाचा धक्‍का बसला. सोलापुरकरांनी यावेळेस नवख्‍या उमेदवारांना महापालिकेत पाठवले असून विद्यमान नगरसेवकांनाही पराभूत केले आहे.
  प्रमूख पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे
  1. विद्यमान महापौर आरिफ शेख यांचे बंधू नगरसेवक तौफिक शेख
  2. माजी महापौर शेवंताबाई पवार
  3. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचे चिंरजीव आणि नगरसेवक मनोज यलगुलवार
  4. माजी महापौर विठ्ठल जाधव
  5. माजी स्‍थायी समिती अध्‍यक्ष केदार उंबरजे
  6. माजी महापौर डॉ. पुरणचंद्र पुंजाल
  7. शिवसेनेच्‍या विद्यमान नगरसेविका अस्मिता गायकवाड
  कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महापौरपदाचे दावेदार अलका राठोड आणि शिवा कांबळे (बाटलीवाला) यांनी आपापल्‍या प्रभागात विजय मिळवला आहे. राष्‍ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्‍हे आणि भाजपचे पांडुरंग दिड्डी यांनी देखील विजय प्राप्‍त केला.
  मतदानाच्‍या आदल्‍या दिवशी मतदारांना घडयाळ वाटप आणि पैसे वाटप केल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले राष्‍ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आपल्‍या प्रतिस्‍पर्धी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला.
  तीन पुतण्‍यांची चुरशीची लढत
  शिवसेना जिल्‍हा संपर्कप्रमूख पुरूषोत्‍तम बरडे यांचे पुतणे आशुतोष, राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते मनोहर सपाटेंचे पुतणे ज्ञानेश्‍वर व महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या चुरशीच्‍या लढतीत कोठे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 12 मधून ते निवडून आले.
  सोलापूर महापालिकेच्‍या प्रचारासाठी कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने स्‍टार प्रचारकांची फौजच सोलापुरात उतरवली होती. राष्‍ट्रवादीने कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, पालकमंत्री लक्ष्‍मण ढोबळे यांच्‍यासारखे तर कॉंग्रेसने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण, प्रदेश अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यासारखे दिग्‍गज नेते प्रचाराच्‍या मैदानात उतरवले होते.
  युतीकडून स्‍टार प्रचारकांनी जरी तोंड फिरवले असले तरी भाजप प्रदेशाध्‍यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनीच प्रचार सभा घेतली.
  एकूण जाहीर झालेल्‍या 102 जागांपैकी कॉंग्रेस 44, राष्‍ट्रवादी 14, भाजप 28, शिवसेना 08, रिपाई 01, बसपा 03, माकपा 03 आणि अपक्ष 01.

  पक्ष आघाडी विजय

  शिवसेना 00 08

  भाजप 00 28

  कॉंग्रेस 00 44

  राष्‍ट्रवादी कॉंग्रेस 00 14

  मनसे 00 00

  इतर 00 08

  एकूण 102

Trending