Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur plastic factory fire

सोलापुरात प्लास्टिक कारखान्यास भीषण आग

प्रतिनिधी | Update - Mar 11, 2012, 07:11 AM IST

दोन कोटींचे नुकसान, बंब वेळेत न पोहोचल्याने आग भडकली

  • solapur plastic factory fire

    सोलापूर - अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अंबिका प्लास्टिक कारखान्यात शॉर्टसर्किटने शनिवारी आग लागली. यामध्ये मशिनरीसह, प्लास्टिक आणि कच्चा माल जळून खाक झाला. यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.या आगीत जीवितहानी मात्र झाली नाही.
    अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत यल्लप्पा नल्ला, वासुदेव नल्ला, नरेंद्र नल्ला यांचे अंबिका आणि नल्ला प्लास्टिक फर्मचा हा प्लास्टिक कारखाना असून, या ठिकाणी प्रामुख्याने प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक ग्लास, टेक्स्टाइल कंपनीस लागणाºया पिशव्या तयार करण्यात येतात. कारखान्याच्या समोरच्या वरील बाजूस नल्ला कुटुंब राहते. शनिवारी सकाळच्या सुमारास कारखान्यात 24 कामगार काम करत असताना मागील बाजूस शॉर्टसर्किटने कारखान्यास आग लागली. प्लास्टिकमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ असल्याने आगीचा भडका उडाला. ते पाहताच आजूबाजूचे कारखानदार आणि तेथे काम करणारे कामगार मदतीसाठी धावून आले; पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने घबराट पसरली. कारखान्याच्या सात कि.मी. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याने कारखाना परिसरात बघ्याची गर्दी होती. अग्निशामक दलाचे बंब वेळेवर आले नाही. बंब येण्यास अर्ध्यातासाचा कालावधी लागला. दरम्यान या परिसरातील कारखान्यातील प्रतिबंधक फवारणी करून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरत असताना अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी आले.
    आग आटोक्यात येत नसल्याने त्या परिसरातील कारखानदारांनी सहा खासगी टँकर मागवले, तरीही आगीचे तांडव सुरूच असल्याने रसायनयुक्त पाणी फवारल्यानंतर आग आटोक्यात आली; पण तोपर्यंत बराच काळ लोटल्याने कारखान्यातील मशिनरी, प्लास्टिक माल, कच्चा माल, कामगारांचे सायकल,फर्निचर जळून खाक झाले होते. या घटनेत अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले.Trending